ऑक्टोंबर महिन्यात १ लाख ५ हजार १५५ कोटी रुपयांचा जीएसटी जमा

7

नवी दिल्ली, २ नोव्हेंबर २०२०: ऑक्टोबर महिन्यात १ लाख ५ हजार १५५ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. एकूण जीएसटी पैकी १९ हजार १९३ कोटी रुपये केंद्रीय कर, २५ हजार ४११ कोटी रुपये राज्यांचा कर आणि ५२ हजार ५४० कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवाकर यांचा समावेश आहे.

कालपर्यंत ऑक्टोबर महिन्याची ८० लाख आर-थ्री-बी विवरणपत्र सादर करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यासाठीच्या सर्व करांचं नियमित विवरण पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यासाठी केंद्रीय वस्तू सेवा कराचं एकूण उत्पन्न ४४ हजार २८५ कोटी तर राज्याच्या वस्तू आणि सेवा कराचं एकूण उत्पन्न ४४ हजार ८३९ कोटी रुपये इतकं होईल.

जुलै महिन्यापासून आतापर्यंत ठोबळ मानानं जीएसटीचं उत्पन्न वाढलेलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा