जीएसटी कपात कागदावरच नवरात्रीच्या मुहूर्तावरही ग्राहकांच्या खिशाला कात्री!

केंद्र सरकारने नवरात्रीच्या निमित्ताने अनेक घरगुती वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा केली. यामुळे टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, तेल अशा ३७५ वस्तूंवरील १८% जीएसटी कमी होऊन तो १२% किंवा ५% झाला आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक बाजारात अद्यापही या कपातीचा कोणताही फायदा ग्राहकांना मिळालेला नाही.

व्यापाऱ्यांकडे जुना साठा शिल्लक असल्याने, तो संपेपर्यंत जुन्याच दराने विक्री सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मोठ्या सुपरमार्केट आणि मॉल्समध्ये जरी नवीन दरांनुसार बिलिंग होत असले, तरी स्थानिक किराणा दुकानात मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना स्वस्त खरेदीसाठी दसरा-दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ग्राहक संघटनांनी या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली असून, सरकारने तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे