गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे जीएसटी कपातीमुळे वाहनांची मागणी वाढली, बुकिंगसाठी दोन महिन्यांचे वेटिंग!

जीएसटी कपातीमुळे वाहनांची मागणी वाढली, बुकिंगसाठी दोन महिन्यांचे वेटिंग!

सरकारने जीएसटी दरात केलेल्या कपातीमुळे वाहन बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली असून, अनेक मॉडेल्ससाठी दोन ते तीन महिन्यांचे वेटिंग लागले आहे.

जीएसटी कपातीमुळे दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमतीत सरासरी ५ ते १० टक्के घट झाली आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. गेल्या दोन दिवसांत बुकिंग दुप्पट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदाच्या सणासुदीत वाहन विक्रीत २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून, पिंपरी-चिंचवडमध्ये २५ हजारांहून अधिक वाहने विकली जाण्याचा अंदाज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version