मुंढवा-केशवनगर परिसरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागरिकांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. एका त्रस्त महिलेने त्यांना थेट विचारले, ना चांगले रस्ते, ना पिण्यासाठी पाणी, अशा परिस्थितीत आम्ही इथे राहायचं कसं? यावर पवार यांनी “कामांना गती देऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
अवैध बांधकाम आणि दारूविक्रीबद्दलही नागरिकांनी तक्रारी केल्या. पवारांनी त्वरित अधिकाऱ्यांशी बोलून बिल्डरांवर कारवाई करण्याचे आणि अवैध दारूविक्री बंद करण्याचे आदेश दिले. तसेच, उशीर झाल्याबद्दल त्यांनी नागरिकांची माफीही मागितली. या भेटीत त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याप्रमाणे अचानक पाहणी करण्याची सूचनाही स्वीकारली.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे