पालकमंत्री अजित पवार यांनी वाफगाव येथील होळकर किल्ल्याच्या संवर्धनासाठी ७ कोटी २० लाख रुपयांचा निधी केला मंजूर

15

खेड, पुणे ५ जानेवारी २०२४ : पुणे जिल्ह्यातील खेड येथील वाफगाव मधील होळकर किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन फंडातून पालकमंत्री अजित पवार यांनी ७ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे वाफगाव परिसराच्या विकासाला गती मिळणार असून येथे पर्यटनाला चालना मिळणार आहे. अशी माहिती होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पत्रकार उपस्थित होते.

६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन दर वर्षी वाफगाव येथील होळकर किल्ल्यावर साजरा होतो. या कार्यक्रमाला राज्य व देशातील होळकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ६ जानेवारीला किल्ल्याच्या संवर्धन कामाला प्रत्यक्षात अजित पवारांच्या उपस्थितीत सुरुवात होणार असल्याचे भूषणसिंह राजे होळकर यांनी सांगितले. यावेळी उद्योजक व स्कुल कमिटी सदस्य धनंजय भागवत उपस्थित होते

न्यूज अनकट प्रतिनिधी : अल हाज आमीन