उस्मानाबाद, १४ ऑगस्ट २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंकरराव गडाख पाटील तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोवीड केअर सेंटरला आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंकरराव गडाख पाटील हे आज उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोवीड केअर सेंटरची पाहणी केली. तेथे असलेल्या रुग्णांची संख्या, तेथील सोयी सुविधा, औषधोपचार या सर्वांची त्यांनी पाहणी केली. कोवीड केअर सेंटरचा पूर्ण आढावा त्यांनी आज घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमरगा येथील मिनाक्षी मंगल कार्यालय येथे उपजिल्हा रूग्णालय अंतर्गत १०० बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन देखील पालकमंत्री मा. ना. शंकरराव गडाख पाटील यांनी आज केले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि संबंधित प्रतिनिधी हे देखील त्यावेळी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड