गुजरातचा दिल्लीला हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश,बंगळुरू आणि पंजाबला असा झाला फायदा..

10
Gujarat Titans vs Delhi Capitals
गुजरातचा प्लेऑफमध्ये प्रवेश,बंगळुरू आणि पंजाबला असा झाला फायदा..

Gujarat Titans vs Delhi Capitals: काल आयपीएलचा ६० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल आणि गुजरात टायटन्स अरुण जेटली स्टेडियमवर आमने सामने आले होते. दिल्लीच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात डिसीने गुजरात समोर २०० धावांचे लक्ष ठेवले होते. तरी सुद्धा दिल्लीला या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. डिसीने दिलेल्या २०० धावांचे लक्ष शूबनम गिलच्या गुजरात टायटन्सने ६ चेंडू व १० विकेट्स राखून पूर्ण केले. गुजरातसोबतच आरसीबी आणि पंजाब किंग्सलाही या विजयाचा फायदा झाला आहे. ते म्हणजे या तिन्ही संघानी प्लेऑफमध्ये आपले स्थान निक्षित केले आहे.

गुजरात संघाने रचला इतिहास :

अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरात संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. के.एल.राहुलच्या दिल्ली कॅपिटल संघाने २० षटकांत २०० धावांचे लक्ष गुजरात संघासमोर ठेवले होते. दुसरीकडे २०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदाणात उतरकलेल्या गुजरात संघाने हा सामना जिंकत आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. गुजरात संघाने २०० धावांचा पाठलाग करताना एकही विकेट्स न गामावता १० विकेट्सने विजय मिळवला अशी कामगिरी करणारा गुजारत संघ हा आयपीएलच्या इतिहसतील पहिलाच संघ ठरला आहे.

के.एल राहुलने झळकावले आयपीएलमधील पाचवे शतक :

घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटलचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाची सुरुवात चांगली झाली नसली तरी त्यांचा डाव चमकदार राहिला. याचे श्रेय के. एल. राहुलच्या फलंदाजीला दिले जाते. राहुलन आपला दमदार फॉर्म ठेवत त्याने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११२ धावा केल्या. राहुलचे आयपीएलमधील हे पाचवे शतक होते. याशिवाय, राहुल आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघाविरुद्ध शतक करणारा जगातील पहिलाच फलंदाज बनला.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर