आज गुजरात नागरी निवडणुकीचा निकाल, २२७६ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये कैद

अहमदाबाद, २३ फेब्रुवरी २०२१: गुजरातमधील नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता त्यांच्या मतमोजणीचीही तयारी करण्यात आली आहे. यावेळेस कोरोना मार्गदर्शिकेची काळजी घेऊन मतदानाची मोजणी केली जाईल. अरविंद केजरीवाल यांच्या आप आणि ओवैसीच्या एआयएमआयएमने भाजप आणि कॉंग्रेसशी तुलना किती जागा मिळवल्या हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या गुजरातमधील ६ महानगरांमधील २२७६ उमेदवारांचे भवितव्य स्ट्रॉंग रूम मध्ये सिल झाले आहे. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीसाठी ईव्हीएम उघडण्यात येतील. गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोट येथे २१ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. त्यानंतर आता २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की गुजरातच्या ६ महानगरपालिकांमध्ये एकूण ५७६ जागा लढवल्या जात आहेत, त्यापैकी अहमदाबादच्या नारायणपुरा मतदार संघात महिला उमेदवार बिंद्रा सुरतीसमोर एकही उमेदवार नसल्याने भाजपाने या निवडणुका पूर्ण होण्यापूर्वीच ही जागा जिंकली आहे. आम आदमी पक्षानेही या निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आम आदमी पार्टी किती जागा जिंकते हे आता पाहावे लागेल. मात्र मोजणी केंद्रांवर पोलिस तैनात आहेत. उद्या सकाळपासून उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममधून बाहेर पडायला सुरुवात होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि कॉंग्रेसने या निवडणुकीला इतके महत्त्व दिलं आहे की स्वत: गृहमंत्री अमित शहा देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मतदान करण्यासाठी आले. असं असलं तरी, ही लढाई केवळ कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात नाही, तर या वेळी आम आदमी पार्टी आणि एआयएमआयएम या मोठ्या पक्षांचे गणितही खराब करू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा