अहमदाबाद, २७ मे २०२३ : मुंबईचे आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले आहे. क्वालिफायर – २ मध्ये गुजरातने मुंबईचा पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या (१२९) शतकी खेळीच्या जोरावर, निर्धारीत २० षटकात ३ बाद २३३ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी २३४ आव्हान मिळाले. सूर्यकुमार यादवने ६१ धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. मुंबईचा संघ सर्वबाद १७१ धावा करू शकला.
इशान किशनला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाल्याने त्याला बदली करावी लागली. नेहल वढेरा (४) आणि कर्णधार रोहित शर्मा (८) सह सलामी देण्यास भाग पाडले. मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात नेहल वढेरा पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या षटकात शमी (२/४१) पुन्हा माघारी परतला आणि त्यावेळी रोहित शर्मालाची विकेट घेतली.
झटपट दोन विकेट्स गमावल्यानंतर, दुखापतग्रस्त कॅमेरून ग्रीनच्या रूपाने मुंबईला मोठा धक्का बसला. असे असतानाही नुकतेच क्रिझवर आलेल्या टिळक वर्माने (४३) गोंधळ घातला. या युवा फलंदाजाने पाचव्या षटकात मोहम्मद शमीवर सलग ४ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा केल्या. रशीद खानने (२/३३) मात्र साहव्या षटकात टिळकला बोल्ड केले.
असे असतानाही सूर्यकुमार क्रीजवर होता आणि ग्रीनही परतला होता. दोघांनीही वेगवान ५२ धावांची भागीदारी करून विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. १२व्या षटकात जोश लिटलने ग्रीनला (३०) बोल्ड करून या आशांना धक्का दिला, पण तरीही सूर्याने झटपट अर्धशतक पूर्ण केले. मात्र, १५ व्या षटकात मोहित शर्माने (५/१०) सूर्याला (६१) बोल्ड केले आणि तिथेच गोलंदाजीवर मुंबईच्या सर्व आशा संपुष्टात आल्या. यानंतर उरलेल्या विकेटही मोहितने गेतल्या आणि १९व्या षटकात मुंबईची पडझड झाली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड