गुजरात : पेपरफुटीनंतर पंचायत कनिष्ठ लिपिक भरती परीक्षा रद्द

नवी दिल्ली , २९ जानेवारी २०२३ :गुजरातमधून कनिष्ठ लिपिक भरतीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. पंचायत कनिष्ठ लिपिक भरतीचा पेपर फुटला असून, पेपर फुटल्यानंतर गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाने ही भरती परीक्षा तूर्तास स्थगित केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज ( दि. २९ ) विविध जिल्ह्यात पंचायत कनिष्ठ लिपिक भरती परीक्षा अकरा ते बारा या वेळेत होणार होती. मात्र परिक्षेपूर्वीच पेपर फुटल्याने आज होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ९.५ लाख पेक्षा अधिकांनी नोंदणी केली होती. उमेदवारांसाठी बसेसमध्ये मोफत परतीचा प्रवास जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी गोदरा बस स्टँडसमोर आंदोलन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पंधरा संशयित व्यक्तिंना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून प्रश्न पत्र आणि एक कॉपी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा