आयपीएल मध्ये गुजरातचा सलग दुसरा विजय; ६ गडी राखत केला दिल्लीचा पराभव

नवी दिल्ली, ५ एप्रिल २०२३: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. मात्र आयपीएल च्या या ७ व्या सामन्यात गुजरातने दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी राखून पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने १८.१ षटकात ४ गडी राखून विजय मिळवला. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक नाबाद ६२ धावा केल्या. डेव्हिड मिलर ३१ धावांवर नाबाद परतला. अक्षर पटेलच्या अवघ्या २२ चेंडूत काढलेल्या ३६ धावामुळेच दिल्लीला झुंज देता आली.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघात दोन बदल पाहायला मिळत असून डेव्हिड मिलर आणि साई सुदर्शन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. केन विलियम्सन व विजय शंकर हे खेळले नाहीत. गुजरातचा हा विजयी धावांचं पाठलाग करताना एकूण १० वा विजय ठरला. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत गुजरातने ११ सामन्यांमध्ये विजयी धावांचा पाठलाग केलाय. त्यापैकी १० वेळा विजय मिळवलाय. तर त्यामध्ये फक्त एकदाच पराभव स्वीकारावा लागलाय. यावरुन गुजरात टीमचा चेसिंगमध्ये हातखंडा असल्याचं स्पष्ट होतं.

दिल्ली कॅपिटल्सच्या एनरिच नॉर्खियाने गुजरात टायटन्सला धक्के देताना वृद्धीमान साहा ( १४) व शुबमन गिल ( १४) यांचा त्रिफळा उडवला. सर्फराजकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तो चाचपडत खेळताना दिसला. त्याने ३४ चेंडूंत ३० धावा केल्या, परंतु त्यात आत्मविश्वास नव्हता. राशीदला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.
अल्जारी जोसेफच्या पुढच्याच चेंडूवर रायली रुसो ( ०) चा अफलातून झेल राहुल तेवाटियाने टिपला. दिल्लीला ६७ धावांवर चौथा धक्का बसला.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली हा केवळ गुजरातचा दुसरा हंगाम आहे. गुजरात संघाने या पहिल्या सत्रात अव्वल स्थान पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर साखळी फेरीत दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले आणि तो सामना गुजरातने जिंकला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा