गुजरात सरकारकडून शेतकर्‍यांसाठी ३ हजार ७०० कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यामध्ये अवकाळीचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, असे असताना गुजरात सरकारने शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर केले आहे.
गुजरातमध्ये १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात अवकाळी पावसामुळे ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी सरकारने ३ हजार ७०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
या निधीचा फायदा राज्यातील ५६ लाख ३६ हजार शेतकर्‍यांना होईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली आहे.
ज्या भागात १०० मिमी अधिक पाऊस झाला. त्या भागातील १ ते २ हेक्टरी ६८०० रुपयांची मदत दिली जाणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा