आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत, त्यामुळे शरीरासोबतच आपल्या ओठांची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.
चला तर पाहूया त्यासाठी आपण काय करू शकतो.
वेलचीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबेक्टीरिअल तत्त्व असतात.
वेलची खाणे केवळ आरोग्यासाठीच योग्य नव्हे तरयाने तोंडातील दुर्गंध देखील दूर होते. वेलचीने त्वचा चमकदार होते तर, विश्वास कोण ठेवेल? पण हे खरं आहे की, वेलची त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
जेव्हा ड्राय झाल्यामुळे ओठ वाळू लगतात किंवा अनेकदा ओठ फाटल्यामुळे त्यातून रक्त येऊ लागतं तेव्हा एक वेलची बारीक वाटून त्यात लोणी मिसळा. दिवसातून दोनदा ही पेस्ट ओठांवर लावावी.
याने ओठांवर नैसर्गिकरीत्या गुलाबीपणा येईल ओठ मुलायम होतील.