भगवंत मान यांच्या पत्नी बनल्या गुरप्रीत कौर, अरविंद केजरीवाल यांनी केले वडिलांचे विधी

38

पंजाब, 7 जुलै 2022:भगवंत मान आणि गुरप्रीत कौर यांचा विवाह अखेर पार पडला आहे. दुपारी बाराच्या सुमारास दोघांचे लग्न झाले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल कुटुंबासह लग्नाला आले होते. त्यांनी लग्नात वडिलांचे विधी पार पाडले. लग्नात मर्यादित पाहुणे बोलावले होते, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच लग्नाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

32 वर्षीय गुरप्रीत कौर या भगवंत मान (वय 48) पेक्षा 16 वर्षांनी लहान आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली. भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. 2015 मध्ये त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा