गुरु ग्रहाच्या युरोपावर पाणी : नासा

नवी दिल्ली: सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरुच्या युरोपा या उपग्रहावर पाणी असल्याचा दावा नासाने केला आहे.
या दाव्यामुळे युरोपावर पाण्याचा मोठा स्त्रोत असलेला सुमद्रही अस्तित्वात असू शकतो असेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
या संदर्भात नासाने एक ट्विट केले असून त्यामध्ये युरोपाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागावरुन अधूनमधून फवाऱ्यांप्रमाणे पाणी बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे.
ताज्या संशोधनावरुन जीवसृष्टीसाठी लागणारे आवश्यक घटक या उपग्रहावर असू शकतात अशी शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा