व्यापारी संघटनांनंतर केडीएमसीत आता जिम चालक सक्रिय..

डोंबिवली, २१ ऑगस्ट २०२०: कल्याण डोंबिवली महापालिकेने दोन दिवसांपुर्वी कल्याण डोंबिवली व्यापा-यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी केडीएमसीने काही नियम व अटीं घातल्या आहेत. व्यापारी संघटना आणि ज्वेलर्स असोसिएशन नंतर आता केडीएमसीत जिम चालक जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करत आहेत.याच पार्श्वभूमीवर ‘डोंबिवली जिम ओनर्स असोसिएशन’ ने पुढाकार घेत ही मागणी केली आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप ही कमी झालेला नाही. कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाउनमुळे केडीएमसीत जिम बंद होत्या. मात्र, आता कल्याण डोंबिवली मधील व्यापाऱ्यांची दुकान तसेच मार्केट सूरु झाली आहेत. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली मधील जिम देखील सुरू करा अशा मागणीचे पत्र घेऊन जिम ऑनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी आमदारांची भेट घेतली. कोरोनाच्या संकटात सर्वच व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये जिम मालकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे जशी व्यापाऱ्यांना दुकान सुरू करण्याची परवानगी दिली तशीच जिम मालकांना देखील जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कडे केली आहे. जिम चालकांनी केडीएमसीचा रस्ता न गाठता पहिल्यांदा मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली.

त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका घालून देईल त्या नियमांचे पालन आम्ही करू मात्र होणारे नूकसान टाळण्यासाठी जिम सूरू होण हे महत्वाच आहे. जिम मालक लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यामुळे हातात पैसा नसल्याने जनजीवन विस्खळीत होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमच्यासाठी सुद्धा केडीएमसीने काही तरी करावे अशी आशा जिम चालकांनी व्यक्त केली आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा