गोल पोस्ट गुन्हा दिल्लीतील प्रीत विहारमध्ये ‘जिम’ मालकाची हत्या; दुचाकीस्वारांनी ऑफिसमध्ये घुसून झाडल्या गोळ्या

दिल्लीतील प्रीत विहारमध्ये ‘जिम’ मालकाची हत्या; दुचाकीस्वारांनी ऑफिसमध्ये घुसून झाडल्या गोळ्या

नवी दिल्ली, ३१ डिसेंबर २०२२ : राजधानी दिल्लीतील प्रीत विहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिममध्ये घुसून मालकावर गोळ्या झाडत त्याचा खून करण्यात आला. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र अग्रवाल असे जिम मालकाचे नाव असून, त्यांचे वय ४५ वर्षे आहे. ते जिम, स्पा अशी हेल्थ सेंटर चालवत होते. जिममध्ये वापरली जाणारी उपकरणे विकण्याचाही त्यांचा व्यवसाय होता. शुक्रवारी रात्री ८ वाजता महेंद्र अग्रवाल आपल्या कार्यालयामध्ये होते. याचवेळी हत्यारबंद तीन लोक तिथे आले. त्यांनी एकानंतर एक अशा गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. त्यातली एक गोळी महेंद्र यांच्या डोक्याला लागली. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान, मारेकऱ्यांनी ऑफिसमध्ये असलेले सीसीटीव्ही सेटअप सोबत नेल्यामुळे, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तसेच पोलिसांनी महेंद्र अग्रवाल यांच्या कुटुंबीयांना या घटनेबाबत माहिती दिली असून, या प्रकरणी कसून तपास करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version