ह. भ. प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्कार प्रदान

मराठवाडा, ४ जानेवारी २०२३ :नवी मुंबई येथील संत ज्ञानेश्वर माऊली संप्रदाय संस्था जुई नगर, यांच्यावतीने दिला जाणारा ‘वारकरी भूषण पुरस्कार’ यंदा जालना येथील ह.भ.प डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांना प्रदान करण्यात आला.

ह.भ. प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर हे डोंगराळ भागातील उच्च टेकडीवर भितीदायक ठिकाणी, परंतू निसर्गरम्य असलेल्या जालना येथील आनंदगड या गडावर राहतात. त्यांनी व्यसनाधीन माणसाला व्यसन मुक्त करत वारकरी बनवले, चोरी मारामारी करणाऱ्यांना पंढरीची ओढ लावली. तरुण मुलांना व्यवसाय मार्गदर्शन करत व्यवसाय करण्यास उद्युक्त केले. या बरोबरच आई वडिलांची सेवा करा, असा संदेश दिला. तसेच कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी बळ दिले. त्यांनी वाघरुळ-नंदापुर येथे यात्रेत सुरू असलेली पशुबळी प्रथा, अंधश्रद्धा, हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या थांबवली. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी नवी मुंबईचे महापौर जयंतराव सुतार, भाजपा महामंत्री राजेश पाटील, नगरसेवक काशिनाथ पाटील, राष्ट्रवादी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेवराव भगत, महीला जिल्हाध्यक्ष माधुरीताई सुतार, भगवान महाराज, सावंत संस्था अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव हनुमंत रोडे, खजिनदार संतोष सोळुंके, महाराष्ट्र युवा कॉंग्रेस सचिव मनोज कायंदे, सरन्यायाधीश मोहन पुरानिक, शिंदे अंबड, विलास टेकाळे, ज्ञानेश्वर घोलपसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विनोद धानले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा