“मूलभूत सुविधांची पूर्तता करून हडपसर येथील प्रसूतिगृह दोन महिन्यात सुरू करू”: आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे
हडपसर विधानसभा शिवसेनेच्या मागणीमुळे पुणे महानगरपालिकेचे आरोग्यधिकारी रामचंद्र हंकारे,सहायक आरोग्य अधिकारी अंजली साबणे यांनी हडपसर येथील आण्णासाहेब मगर प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आरोग्यप्रमुख हंकारे म्हणाले की, या ठिकाणी कमीत कमी वेळे मध्ये ज्या काही अडचणी असतील त्या भवन कडून पूर्ण करून आमच्या विभागाकडून उरलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून येथील प्रसूती गृह आणि इतर सुविधा मी प्रत्येक्ष लक्ष घालून दोन महिन्यात सुरून करून देऊ. त्याचबरोबर कोंढवा येतील मीनाताई ठाकरे प्रसूती केंद्रातील बंद असलेले ऑपरेशन कक्ष आणि संबंधित डॉक्टर नेमणूक करून पूर्ण क्षमतेने ६ जानेवारी. ला सुरू करण्यात येईल,
यावेळी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सदरील कामासाठी सर्व अडचणी सोडवून सर्वतोपरी प्रयत्न करून हे प्रसूतिगृह पुन्हा सुरू करण्यात येईल.भवन चे अधिकारी लंके आणि सर्व विभातील अधिकारी उपस्तिथ होते.
“आमची मागणी गोर गरीब लोकांच्या हक्कासाठी न्याय मागणी आहे,दोन महिन्यात प्रसूतिगृह आणि सोयी सुविधा चालू न झाल्यास हडपसर शिवसैनिक रस्त्यावर उतरून ही मागणी पूर्ण करून घेईन” असे उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर म्हणाले.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे,शहरसंपर्क प्रमुख विजय देशमुख,विधांसंभा प्रमुख तानाजी लोणकर,विधानसभा समनवयक समीर तुपे,उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर,विभाग प्रमुख,राजेंद्र बाबर,प्रशांत पोमन,सतीश कसबे,खंडू जगताप,अभि भान गिरे,जान मोहम्मद,प्रभाकर कदम,मारुती ननावरे,बाबू काळे,गौरव गायकवाड,राजेश शेलार,अमित गायकवाड,गणेश जगताप,उल्हास वाडेकर, प्रेम कसबे,नागेश कुचेकर,सचिन कापरे,अमित कांबळे,महिला आघाडी नीता भोसले,सुनंदा देशमुख इत्यादी उपस्थित होते.