आमदार संजय जगताप यांच्या हस्ते हडपसर ते जेजुरी एमआयडीसी बस सेवेचा शुभारंभ

पुरंदर, १२ डिसेंबर २०२०: पुणे महानगर परिवहननं सुरू केलेल्या हडपसर ते जेजुरी बस सेवेचा शुभारंभ पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज पासून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

आज सकाळी पुरंदरचे आमदार संजय जगताप व जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष विना सोनवणे यांच्या हस्ते जेजुरी येथे बसचं पूजन करण्यात आलं. यावेळी पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जेजुरीच्या नगराध्यक्षा विना सोनवणे, युवक काँग्रेसचे नेते गणेश जगताप, प्रदीप पोमन, सुनिता कोलते, आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे महानगर परिवहनच्या कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आज बारा ठिकाणी ही बस सेवा सुरू केली आहे. या बस सेवेचा ग्रामीण भागातील लोकांना फायदा होणार असल्यानं सामान्य जनते कडून याबाबत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत बोलताना आ. संजय जगताप म्हणाले की, या बस सेवेमुळं पुरंदरच्या ग्रामीण भागातील लोकांना चांगला फायदा होणार आहे. त्याच बरोबर जेजुरी एमआयडीसी तील कामगारांना याचा फायदा होणार आहे. जे कर्मचारी पुण्याहून कामाला येतात त्यांच्यासाठी हे सोईचं ठरणार आहे. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर पुणे महानगर परिवहनच्या संचालक मंडळाचे आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा