हाफिज सईदला वाचवण्याचा ‘आश्चर्यकारक’ खेळ

पाकिस्तान: दहशतवादाबद्दल पाकिस्तान सरकारने कितीही दिखावे केले असले तरी सत्य काही वेगळेच आहे. मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि बंदी घातलेल्या जमद-उद-दावा प्रमुख हाफिज सईदला दहशतवाद्यांच्या निधीसंदर्भात लाहोरमधील न्यायालयात दोषी ठरवले जाऊ शकले नाही.
वास्तविक, दहशतवादी हाफिज सईदला शनिवारी या हाय प्रोफाइल सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले होते, परंतु या प्रकरणातील आणखी एक आरोपी मालिक जफर याला अधिकारी हजर करू शकला नाही. यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ‘डॉन’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आरोपींच्या अनुपलब्धतेमुळे कोर्टाचे न्यायाधीश मलिक अरशद भुट्टा यांनी ११ डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे त्यामुळे आता पुन्हा ही सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे, जमद-उद-दावाच्या अनेक नेत्यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्यावरील आरोप निराधार असून पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय दबावाखाली कार्य करीत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा