हज यात्रेसाठी होणार १० हजार ४०८ यात्रेकरूंची नोंद

25

मुंबई : यंदाच्या वर्षी होणाऱ्या हज यात्रेसाठीची १० हजार ४०८ भाग्यवान यात्रेकरूंची नोंद करण्यात आली आहे. २८ हजार ७१२ यात्रेकरूंकडून या यात्रेसाठी अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी संगणकीय सोडतीद्वारे भाग्यवान यात्रेकरूंची निवड करण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली.

राज्याला एकूण १२ हजार ३४९ इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला आहे. यामध्ये ७० वर्षाहून अधिक वय असलेल्या १ हजार ९१० ज्येष्ठ इच्छूक यात्रेकरूंनी अर्ज केले आहेत. महिला राखीव प्रवर्ग ३१ आहेत. खुला प्रवर्ग १० हजार ४०८ असा आहेत.
राखीव प्रवर्ग संख्या १ हजार ९४१ जागा वगळता उर्वरीत एकूण हजार 408 हज यात्रेकरुंकरिता आज संगणकीय सोडत (लॉटरी) काढण्यात आली.
राज्यातून निवड झालेले हज यात्रेकरु मुंबई, नागपूर, औरंगाबाद व हैद्राबाद या गंतव्य स्थानावरून या वर्षीच्या हज यात्रेस रवाना होणार आहेत.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खान, कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा