वाढदिवसाचा खर्च टाळून पोलीस, आरोग्य विभागाला दिले हॅन्डग्लोज

पुरंदर, दि. १७ जून २०२०: सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. यासाठी सर्वजण आपापल्या पद्धतीने कोरोना विरोधात लढा देत आहेत. अशावेळी आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा वाढदिवस साजरा करण्यासाठी खर्च न करता त्याचा योग्य मार्गाने उपयोग व्हावा म्हणून निरा येथील भैय्यासाहेब खाटपे यांनी पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासनाला हॅन्डग्लोजचे वाटप केले.

नीरा येथील भैय्यासाहेब खाटपे हे अनेक सामाजिक कामात अग्रेसर असतात. आज त्यांचा वाढदिवस होता. दरवर्षी ते आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करतात. मात्र यावर्षी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोरोनाच्या युद्धामध्ये जे रणांगणात उतरून लढाई करत आहेत अशा योद्ध्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

सध्या हॅन्डग्लोजचा तुटवडा असल्यामुळे ते मिळायला उशीर लागत आहे. म्हणून खाटपे यांनी पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस प्रशासन यांना हॅन्डग्लोजचे वाटप केले. यामध्ये पुरंदर तालुक्यातील नीरा, बेलसर, वाल्हे, परींचे, माळसिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सासवड, जेजुरी, सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन नीरा औट पोस्ट उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सासवड या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी दोन हजार हॅन्डग्लोचे वाटप केले.

त्यावेळी ते म्हणाले की हे सर्व लोक वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात अशावेळी कोरोना रुग्णांशी त्यांचा संपर्क होऊ शकतो त्यासाठी त्यांना मास्क बरोबरच हॅन्डग्लोज वापरणे सुद्धा गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा