Happy birthday किंग ऑफ आर्ट सिनेमा पद्मश्री स्मिता पाटील

पुणे, १७ ऑक्टोंबर २०२२: काही माणसं आपल्यातून खुप लवकर निघून जातात याची एक खंत मनाला सारखी जाणवते ज्या अभिनेत्रीने कलाक्षेत्राला एक नवी ओळख मिळवून दिली, जिच्या नाकावर रूपेरी नथ. ती हसायला लागली की सबंध वातावरण खळखळून उठायचं..अभिनय एवढा परिपक्व की रसिक मन केंव्हाही तिच्या चरणी लीन व्हायचे. तिच्या निव्वळ डोळ्यांच्या हालचालीवरून अभिनय कसा करायचा याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्मिता पाटील यांची आज 67 वी जयंती

अवघ्या १० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ८० चित्रपट केले. निशांत’, ’मंथन’, ’भूमिका’, ’जैत रे जैत’, ’गमन’, ’चक्र’, ’उंबरठा’ इत्यादी चित्रपट खूप लोकप्रिय झाले. पदार्पणाच्या ४ वर्षांनंतर १९७७ मध्ये ‘भूमिका’ चित्रपटासाठी त्यांना पहिला तर १९८० मध्ये ‘चक्र’ साठी दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.

स्मिता पाटीलने समांतर आणि व्यावसायिक असे दोन्ही सिनेमे केले. कधी स्मिता नसीरुद्दीन शहा यांच्यासोबत झळकली तर कधी त्याच आत्मविश्वासाने अमिताभ बच्चन यांच्यासमोर ती उभी राहिली. समोर कलाकार कोणीही असो, स्मिताचा अभिनय नेहमीच दर्जेदार असायचा.

त्यांच्या नैसर्गिक अभिनयाचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्यावर चित्रित झालेली सदाबहार गाणी, आज रपट जाएँ तो हमें ना उठई यों, आपकी याद आती रही रातभर, गगन सदन तेजोमय, जांभूळ पिकल्या झाडाखाली, तुम्हारे बिना जीना लागे घर में, दिखाई दिए यूँ के, मी रात टाकली, साजन के गुण गाये, सावन के दिन आये इत्यादी…

जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा उल्लेख होईल, तेव्हा स्मिता पाटील यांचं नाव कायमस्वरूपी अग्रस्थानी असेल. जेमतेम आयुष्य सुरू झालेलं आणि पहिल्या बाळाच्या आगमनात त्यांचे कायमचे निघून जाणं हे चटका लावून गेलं. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती. निखळ सौंदर्य असं समीकरण असलेल्या स्मिता या नेहमीच चाहत्यांच्या कायम आठवणीत राहतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा