हार्दिक पांड्याला संतान प्राप्ती : सोशल मीडिया वर दिली गूड न्यूज.

मुंबई , ३० जुलै २०२० : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने सोशल मीडिया वर एक फोटो शेअर करत गोड बातमी दिली आहे. हार्दिक पांड्या ‘बाबा’ झाला आहे. हार्दिकची गर्लफ्रेंड नताशा हिने मुलाला जन्म दिला आहे.

हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्र रत्न झाला आहे. हार्दिक नताशा आई – बाबा झाल्याचं हार्दिकने ट्विटर वरून सांगितलं. लॉकडाऊन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर हार्दिकने इंस्टाग्राम अकाउंट वरून चार फोटो पोस्ट केले होते.

२०२० च्या पहिल्याच दिवशी त्यानं नताशा सोबत साखरपुडा केला होता. अगदी वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिक आणि नताशाने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला होता. आणि मुख्य म्हणजे याबाबत हार्दिकच्या घरच्यांनाही माहिती नव्हती. हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला.

मुंबईत एका पार्टीमध्ये हार्दिक आणि नताशा या दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. नताशानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावर‌ॆ.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा