गोल पोस्ट इतर उदयपूरमध्ये हार्दिक पांड्या पुन्हा करणार लग्न !

उदयपूरमध्ये हार्दिक पांड्या पुन्हा करणार लग्न !

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२३ :भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक लाइफमुळे अनेकदा चर्चेत असतो. अशाच एका कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार आहे. हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टेवोविकसोबत दुसऱ्यांदा पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहे. यापूर्वी त्यांनी २०२० मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला. दरम्यान, लग्नाच्या ३ वर्षानंतर हार्दिक-नताशा पुन्हा बोहोल्यावर चढणार आहेत.

  • १४ फेब्रुवारीला होणार लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि नताशा १४ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये एका भव्य समारंभात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह सोहळा १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १६ पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमात हळद, मेहंदी आणि संगीत होणार आहे.

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती २०१४ मध्ये बिग बॉसच्या सीझन ८ मध्ये दिसली होती. त्यानंतर २०१८ मध्ये नताशा शाहरुख खानच्या झिरोमध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती. नताशा स्टॅनकोविक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय असून, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नताशा तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version