हार्दिकने उघडले आपल्या यशाचे रहस्य, म्हणाला- मला आत्ता अजिबात भीती वाटत नाही

पुणे, २५ ऑक्टोबर २०२२ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताने सुपर १२ मधील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्स राखून पराभव केला. या विजयात भारतात स्टार फलंदाज विराट कोहलीचा सर्वात मोठा हात होता. कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पांड्या यानेही भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

या सामन्यानंतर हार्दिक ने bcci टीव्ही जवळ बोलताना आपल्या नजीकच्या काळातील यशाचे रहस्य उलगडले आहे. हार्दिक ने मागील सहा महिन्यापासून आपल्या यशाचे गमक काय आहे हे सांगितले. तो म्हणाला की मी अपयशाला घाबरणे सोडून दिले आहे. काही वर्षांपूर्वी क्रिकेट मधील भविष्याबाबत चिंता वाटत होती. मात्र आता अपयशाचे भय निघून गेलं आहे. आता पूर्वीसारखा मी अधिक विचार करत नाही. त्यामुळे माझ्याकडून सतत चांगली कामगिरी होत आहे.

हार्दिक ने वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात ४ षटकार ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. व फलंदाजीत ४० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. याचं बरोबर आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मध्ये हार्दिक ने फलंदाजीत १००० धावांचा आणि गोलंदाजी ५० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. तो अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा