Hardik Pandya Statement MI vs PBK : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या स्पर्धेत काल जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमने- सामने आले होते. या सामन्यात पंजाब संघाने मुंबईचा 7 विकेट्सने पराभव केला. यंदाच्या हंगामातील दोन्ही संघाचा शेवटचा समाना होता. यात पंजाबने विजय मिळवून पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. याशिवाय पाच वेळा चॅम्पियन्स राहिलेल्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या मोसमतील आपला शेवट गोड करता आला नाही. त्यामुळे त्यांना चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.त्यामुळे मुंबईला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
काल झालेल्या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून पंजाब संघाने गोलंदाजी केरण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवाच्या 57 धावांच्या अर्धशतकी खेळीसह 20 षटकात 7 बाद 184 धावा केल्या. त्यानंतर 185 धावाचा पाठलाग पंजाब किंग्सने 18.3 षटकात 3 बाद 187 धावा करून पूर्ण केला. प्रियाश आर्याने 62 धावांची आणि जोश इंग्लिसने 73 धावांची दमदार खेळी केली. या दोघांमध्ये 109 धावांची राहिली ज्यामुळे मुंबईला पराभावाचा सामाना करावा लागला.
काय म्हणाला कर्णधार हार्दिक पांड्या:
पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘तो म्हणाला, खेळपट्टी ज्या प्रकारची होती, आम्हाला नक्कीच 20 धावा कमी पडल्या. पण अस होत. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. हा असा एखादा दिवस असतो, जेव्हा आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेकत नाही आणि त्याचाच आम्हाला फटका बसला.’
पुढे तो म्हणाला की, ‘आयपीएल असेच आहे. या फ्रेंचायजी 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत, पण हे नेहमीच सोपे नव्हते. जर तुम्ही गती कमी राखली, तर इतर संघसुद्धा सामना जिंकण्यासाठी तेवढेच उत्सुक असतात. पण मेसेज सोपा आहे, हा एखादा समाना असा असतो,पण यातून शिका आणि एलिमिनेटरकडे लक्ष द्या.’
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर