मुंबई २० जानेवारी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा हंगाम पुढच्या काही दिवसात सुरू होणार असून टीम इंडिया धुमाकूळ घालण्यासाठी तयार झाली आहे. भारतीय संघाची नुकतीच बीसीसीआयच्या मुंबईच्या कार्यालयात अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. ज्या दिवसापासून संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून हार्दिक आणि शुबमन गिल चर्चेत आले आहेत.
वास्तविक, जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर प्रसार माध्यमांवरती बातम्या प्रसारित व्हायला लागल्या की, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हार्दिक पांड्याला चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून बनवू इच्छित होता. परंतु, कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर हे शुबमन गिलला उपकर्णधार म्हणून निवड करण्यासाठी ठाम होते. ही बातमी समोर येताच नेटकऱ्यांनी रोहित आणि अजित आगरकर यांच्यावर थेट निशाणा साधलाय.
मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माकडून कर्णधार पद काढून घेत हार्दिक पांड्यावर सोपवले तेव्हापासून रोहित आणि हार्दिक यांच्यात मतभेद सुरू आहेत अशा बातम्या येत आहेत. आयपीएल २०२५ मध्ये हार्दिक कर्णधार असताना, रोहितला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात कोठेही पाठवायचा आणि बऱ्याचदा मैदानात काहीही बोलायचा, तेव्हा हार्दिकला स्टेडियम मध्ये चाहते सतत टार्गेट करायचे, त्यावेळी अनेक चाहत्यांनी हार्दिकला मैदानता शिवीगाळ सुद्धा केली होती. पण वास्तविक पाहता प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलत चाललाय. आता कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी हार्दिक पांड्या सोबत राजकारण केलं आहे असे बोलले जातय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर












































