६५ वर्षीय हरीश साळवे करणार दुसरं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्यांची भावी पत्नी

10

लंडन, २६ ऑक्टोबर २०२०: माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे पुढील आठवड्यात लग्नाची गाठ बांधणार आहेत. हरीश साळवे हे एक नामांकित वकील असून ते ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल येथे आहेत. ६५ वर्षीय साळवे गेल्या महिन्यात आपल्या पत्नी मीनाक्षी साळवेपासून कायदेशीररित्या वेगळे झाले होते, त्यांनी आपले ३८ वर्षांचे विवाहित जीवन सोडत हा निर्णय घेतला. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांना दोन मुलंही आहेत. हरीश साळवे हे आपली मैत्रीण कॅरोलिन ब्रोसार्ड यांच्याशी लंडनमधील एका चर्चमध्ये २८ ऑक्टोबरला लग्न करणार आहेत. हे दोघांचे दुसरे लग्न आहे.

साळवे यांनी ख्रिस्ती होण्यासाठी आपला धर्म बदलला आहे. मागील दोन वर्षांपासून ते आपल्या भावी पत्नी कॅरोलीनसह लंडनमधील चर्चमध्ये नियमितपणे येत आहे. हरीश साळवे आणि कॅरोलिन या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. या दोघांनाही पूर्वीच्या लग्नांपासून मुलं आहेत. कॅरोलिन, व्यवसायाने एक कलाकार आहेत. त्यांचं वय ५६ असून एका मुलीच्या त्या आई आहेत. हरीश साळवे यांची कला प्रदर्शनात (आर्ट एग्जीबिशन) कॅरोलिनशी भेट झाली. दोघांमधील ही पहिली भेट हळू हळु नंतर नात्यात बदलत गेली.

घटस्फोटानंतर मुलांपासून दूर असूनही कॅरोलीननं लंडनमध्ये त्यांना भावनिकरित्या चांगलं हाताळलं आहे. इथूनच पुढं सोबत राहण्याचा निर्णय दोघांनी घेतला.

सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे आणि साळवे दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत. दोघांनी महाराष्ट्रातील नागपूर शहरात शिक्षण घेतलं. १९७६ मध्ये साळवे दिल्लीत आणि बोबडे मुंबई उच्च न्यायालयात आले. नंतर बोबडे हे हायकोर्टाचे न्यायाधीश आणि साळवे वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सॉलिसिटर जनरल बनले.

हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच त्यांच्या कौशल्यामुळं प्रख्यात वकील आहेत. यामुळेच भारत सरकारनं सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नेमणूक केली. कुलभूषण यादव सारख्या प्रकरणां सारखी अनेक चर्चित आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकरणांमध्ये साळवे यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती व देशाला गौरवांकित केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा