आयपीएलच्या १६व्या मोसमातील हॅरी ब्रूकने झळकावले पहिले शतक

कोलकाता, १५ एप्रिल २०२३ : कोलकाता विरुद्ध हैदराबाद आयपीएलच्या या हंगामातील १९वी लढत ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आली. हैदराबादने २३ धावांनी विजय मिळवला. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादचा सलामीवीर हॅरी ब्रुकने १००* (५५) मोसमातील पहिली शतकी खेळी केली तर कर्णधार मार्करमने अर्धशतक झळकावले. २२९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाताला मार्को जेनसेनने सुरुवातीला हादरे दिले. कर्णधार नितीश राणा ७५ (४१) व रिंकू सिंह ५८*(३१) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

ईडन गार्डन्सवर कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने दमदार सुरुवात केली. हॅरी ब्रूकने पहिल्याच षटकात आक्रमण केले. मात्र, दुसऱ्या टोकाला असलेल्या रसेलच्या चेंडूवर मयंक अग्रवालने आपली विकेट गमावली. बाद होण्यापूर्वी त्याच्या आणि ब्रूकमध्ये ४६ धावांची भागीदारी झाली होती.

पॉवरप्लेनंतर कोलकात्याच्या फिरकीपटूंनी हैदराबादचा रनरेट कमी केला. हॅरी ब्रूकही फिरकीपटूंसमोर फसताना दिसला पण यानंतर कर्णधार एडन मार्कराम आला आणि त्याने फिरकीपटूंवर हल्ला चढवला. मार्करामने अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक ठोकले. मात्र, अर्धशतक झळकावताच एडन मार्कराम बाद झाला. मार्कराम बाद झाल्यानंतर ब्रूकने पुन्हा गियर बदलला. या खेळाडूने वेगवान खेळी खेळताना आपल्या शतकाच्या दिशेने पावले टाकली आणि अखेरच्या षटकात ब्रूकने शतक पूर्ण केले. या मोसमात शतक झळकावणारा ब्रूक हा पहिला खेळाडू ठरला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा