निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल वक्तव्य त्यांना चांगलाच अंगलट येताना दिसत आहे. कारण निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आचारसंहिता प्रमुखांना तक्रार दिली आहे. त्यानुसार जाधव यांच्या विरोधात कन्नड पोलीस ठाण्यात आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता पथक प्रमुख राममोहन डोंगरदिवे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. कलाम ११८ प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळाली त्यातूनच 16 ऑक्टोबरला हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. जाधव यांच्या समर्थनगर भागातील घरावर मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी हर्षवर्धन जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि घरावर दगडफेक केली.
शिवीगाळ करणे तसेच जातीय भावना भडकावणे असे आरोप करत नगरसेवक राज वैद्य यांनी तक्रार केली होती .