इंदापूर, १२ डिसेंबर २०२०: शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.१२) करण्यात आला. कारखान्यावरती पूर्वीपासून डिझेलचा पंप कार्यान्वित आहे. आज पासून सुरु झालेल्या पेट्रोल पंपामुळं शेतकऱ्यांची सोय झाली आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
नीरा भीमा कारखान्यानं आजअखेर २,३४,७०३ मे. टन ऊसाचे गाळप केलं आहे. आसवणी प्रकल्पातून आजपर्यंत इथेनॉलचं १२८७५४३ लि. व अल्कोहोलचं २२,४३,७१५ लि. चं उत्पादन घेतलं आहे. तर सह-वीजनिर्मिती प्रकल्पामधून १०,६००,८०१ युनिट वीज विक्री करण्यात आलेली आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार उपस्थित होते. प्रारंभी प्र. कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील यांनी स्वागत केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे












































