गोल पोस्ट महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट…

मुंबई, ५ सप्टेंबर २०२० : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून एक वर्ष पुर्ण झाले त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.५) रोजी राजभवन येथे भेट घेत अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी कोविंड परिस्थितीमुळे उद्भवलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात व इतर विषयांवरती चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या.

राज्यपाल महोदयांनी या सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढू असे त्यांना यावेळी आश्‍वस्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- निखिल कणसे.

error: Content is protected !!
Exit mobile version