हर्षवर्धन पाटील यांची कोरोना संदर्भात तहसीलदारांशी चर्चा

इंदापूर, दि.१५ मे २०२०: सध्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्यामुळे सामान्य जनता अडचणीत आहे. त्यामुळे शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, यासंदर्भात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (शुक्रवारी) इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी भाजप शिष्टमंडळासह चर्चा केली.
यावेळी इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष नानासाहेब शेंडे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, भाजपचे इंदापुर शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी उपसभापती देवराज जाधव, महेंद्र रेडके, उपसभापती संजय देहाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुका भाजपच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी चर्चेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासनास विविध सुचना केल्या.

इंदापूर तालुक्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे त्वरित टँकरने पाणीपुरवठा चालू करण्यात यावा. तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावेत. तसेच मनरेगा अंतर्गत गावोगावी जनतेला रोजगार उपलब्ध करून देणेसाठी तातडीने कामे सुरू करण्यात यावीत, लॉकडाऊनमुळे नागरिक अडचणी असल्याने सर्व कार्डधारकांना गहू, तांदूळ यांचा पुरवठा होईल याची दक्षता घेण्यात यावी आणि तालुक्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची स्वैब टेस्ट घेण्यासाठी इंदापूर, भिगवण, वालचंदनगर बावडा, सणसर, निमगाव केतकी येथे कोरोना टेस्ट लॅब चालू करण्यात याव्यात, आदी सूचना यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासनास केल्या.

तसेच इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, डॉक्टर हे सर्वजण कोरोना विरुद्धच्या लढाईत चांगले परिश्रम घेत आहेत. याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे यावेळी आभार व्यक्त केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा