हडपसर भाजी मार्केट झाले सुरू शेतमाल”घेऊन येण्याचे आव्हान!

हाडपसर:देशभरात कोरोना या घातक रोगाने थैमान मांडले आहेच संचारबंदी लागू आहेच मात्र जीवनावश्यक वस्तू सुरू ठेवल्या आहेत..नागरिकांना भाजीपाला , किराणा मिळावा यासाठी हडपसर येथील भाजी मार्केट नियमित सुरू करण्यात आलाय. हाडपसर येथील भाजी मंडई आवारात आज भाजीपाल्याची आवक झालेली पाहायला मिळाली. शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात घेऊन यावा असे आवाहन पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट मित्रमंडळाने केल आहे. मार्केट साप्ताहिक सुट्टी सोडून नियमित चालू राहणार आहे. बाजारातील सर्व घटकांना बाजार सुरळीत चालू ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून मंडई सुरू करण्यात आली आहे. तसेच हडपसर बाजार समिती पदाधिकारी यांच्या समवेत बैठक झाली. सचिन शेवाळे नेमकं काय म्हणाले पाहूया.

तसेच बाजार आवारात फळे, कांदा बटाटा आणि तरकरी त्यामुळे बाजारात गर्दी कमी कशी होईल हे पाहावे. तसेच पहाटे पाच वाजण्याच्या आधी शेत मालाच्या गाड्या खाली करून बाहेर पाठवाव्या. त्यामुळे पहाटेच्या वेळी असणारे कामगार लवकर बाहेर पडतील. बाजारात ठराविक अंतर ठेऊन काम करणे याबाबत हाडपसर पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट मित्रमंडळाने सकाळ पासून शेतकरी-व्यापारी कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजी मंडई सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.व बाजारात खरेदीसाठी येत असताना तोंडाला मास्क,किंवा रुमाल बांधून घराच्या बाहेर पडावे व लहान मुले वृध्द लोकांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही व सर्व ग्राहकाने माल खरेदी करताना तिन फूट अंतर ठेवून माल खरेदी करावा व ग्राहकांनी विनाकारण काम नसताना बाजारात येऊ नये तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.व बाजार सुरू झाल्यानंतर त्यात काय बदल करायचा हे त्यावेळी परिस्थिती बघून ठरवले जाईल. अशी माहिती मार्केट मंडळाने दिली आहे.यावेळी बोलताना
सचिन शेवाळे, शांताराम भालसिंग, प्रवीण टिळेकर, सतीश राऊत, शंकर लोखंडे,व ग्राहक,व पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट मित्रमंडळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा