हातावर पोट असणारा तरुण स्व- खर्चाने भागावतोय रस्त्यावरील नागरिकांची भूक

पुणे, दि.२ जून २०२०: पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत. माणसांसोबत पक्षी प्राण्यांचे मात्र प्रचंड भुकेने हाल होत होते. त्यात पुण्यातील आंबील ओढा वसाहतीमध्ये राहणारा एक तरुण स्व-खर्चातून नदी पात्रातील प्राण्यांना, पक्षांना खायला देत आहे. मात्र, तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रस्त्यावर फिरणाऱ्या गरीब लोकांना एकवेळचे जेवण स्व- खर्चाने बनवून त्याचे वाटप केले. त्या तरुणाचे नाव आहे ऋषी भिसे.

या तरुणाची घरची परिस्थिती जेमतेम. हातावर पोट असूनही त्याची इतर लोकांविषयी असणारी भावना त्याने प्रत्यक्षात उतरून दाखवली. हा तरुण कुल्फी विकण्याचा व्यवसाय करतो. आता लॉकडाऊनच्या काळात त्याच सगळच ठप्प झाले, तरीही त्याचा साठवलेल्या पैशातून तो ही मदत करीत आहे.

यावेळी ऋषी म्हणाला की, आज सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतू जे लोक रस्त्यावर राहतात, त्यांची अवस्था एवढी भयानक आहे की, त्यांना एक वेळचे अन्न देखील कुणी खायला देत नाही. याच जाणिवेतून आणि सामाजिक बांधिलकीतून मी स्व-खर्चातून त्यांना एकवेळचे जेवण स्वतः तयार करून त्यांना देतो. यातून मला समाधान तर मिळतेच आणि समाजासाठी काही तरी केल्याचा आनंदही मिळतो. माझ्यासारखे काम करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, आणि शक्य तितकी मदत या संकटाच्या काळात करावी, असे आवाहन त्यांनी “न्युज अनकट” शी बोलताना केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा