हाथरस प्रकरण: पीडितेचा भाऊ आणि आरोपी यांच्यात १०० वेळा संभाषण

हाथरस, ७ ऑक्टोंबर २०२०: हाथरस बलात्कार प्रकरणाच्या चौकशीत नवीन खुलासा समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना तपासात असं आढळलं आहे की, पीडितेचे कुटुंब आणि मुख्य आरोपी संदीप फोनद्वारे संपर्कात होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीडितेच्या कुटुंबातील आणि संदीप यांच्यात फोन संभाषण सुरू झालं. पीडितेचे कुटुंब आणि आरोपी यांच्यात फोनवर १०४ संभाषण झाले.

हाथरस घटनेत हा खुलासा यूपी पोलिसांच्या तपासात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी व पीडितेच्या कुटूंबाच्या कॉल रेकॉर्ड शोधले असता त्यांना हे आढळलं की, गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला हे संभाषण सुरू झालं होतं. सर्वाधिक कॉल चंदपा भागातूनच करण्यात आले आहेत, जे पीडितेच्या गावपासून फक्त २ किमी अंतरावर आहे.

त्यापैकी ६२ कॉल हे पीडितेच्या कुटूंबियांनी केले आहेत, तर ४२ कॉल आरोपी संदीपनं केले आहेत. यूपी पोलिसांनी केलेल्या तपासणीत पीडितेचे कुटुंब आणि आरोपी संदीप यांच्यात नियमितपणे काही काळ संभाषण झाल्याचं दिसून आलं. पीडितेच्या भावाच्या वतीनं आरोपी संदीपला कॉल करण्यात आला.

दरम्यान, विशेष तपास पथकाची (एसआयटी) चौकशीही अंतिम टप्प्यात आहे. एसआयटी बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपला अहवाल सादर करू शकते. गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या नेतृत्वात डीआयजी चंद्र प्रकाश आणि एसपी पूनम यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे.

एसआयटी’नं गेल्या आठवड्यात चौकशी सुरू केली आणि ते सात दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचं सांगितलं. एसआयटीची टीम पीडित रहिवासी असलेल्या चंदपा गावातही पोहोचली होती. एसआयटीनं पीडितेच्या कुटूंबाचेही निवेदन घेतले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा