लखनऊ, २१ ऑक्टोबर २०२०: हाथरस सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू आहे. दरम्यान, अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सुट्टीच्या रिक्त जागांवर काम करणाऱ्या दोन डॉक्टरांना तातडीने काढून टाकण्यात आलं आहे. एएमयू’च्या व्हीसीच्या आदेशानं हे दोन्ही डॉक्टर काढून टाकण्यात आले आहेत.
जेएन मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन आणि ट्रॉमा मधील कार्यकारी सीएमओ म्हणून कार्यरत असलेले डॉ. अजीम आणि डॉ. ओबैद यांना युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्राध्यापक तारिक मन्सूर यांच्या आदेशानं निलंबित करण्यात आलं आहे.
डॉ. अजीम यांनी हाथरस प्रकरणाबद्दल आपलं मत मांडलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, जर १० ते १२ दिवसात नमुना गोळा केला गेला तर त्यात बलात्काराची पुष्टी करणं कठीण होतं. सोमवारी सीबीआयच्या पथकानं हाथरस प्रकरणाच्या संदर्भात जेएन मेडिकल कॉलेजचीही चौकशी केली. सीबीआयच्या पथकानं मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांशी सात तासापेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती.
त्याच वेळी, दोन्ही डॉक्टरांचे म्हणणे आहे की ज्या कारणास्तव त्यांना निलंबित केलं गेलं आहे, त्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत सहा डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यावर ड्यूटीवर बोलविण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्या भयंकर कोरोना संक्रमणादरम्यान कोणीही येथे काम करण्यास तयार नव्हतं. परंतु, ती तयारी आम्ही दाखवली.
डॉक्टर म्हणाले की, या काळात अडीच महिन्यांनंतर हाथरसची घटना घडली ज्यामध्ये आम्ही माध्यमांना कोणतीही मुलाखत दिली नाही. प्रसार माध्यमातील लोकांनी फोन करून फॉरेन्सिक रिपोर्ट विषयी काही माहिती विचारली होती, जी आम्ही स्पष्टपणे देऊन टाकली. आम्ही डॉक्टर म्हणून अशी माहिती देऊ शकतो. सोमवारी सीबीआयची टीमही आली. परंतु सीबीआय टीमची आमच्याशी थेट चर्चा झाली नाही.
कुलगुरूंना आवाहन
डॉक्टर म्हणाले की कोणत्या कारणास्तव आमच्या सेवा बंद केल्या आहेत, आम्हाला सांगावं? आमचा स्वातंत्र्य आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणून आम्ही व्हीसी साहेबांना पत्र देखील लिहिलं आहे आणि ते आमच्या भविष्याच्या हिताचा विचार करतील अशी अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे