हाथरस गँगरेप प्रकरण: युपी सरकार विरोधात ट्विटरवर होतायत हे ९ हॅशटॅग्स ट्रेंड  

हाथरस (उत्तर प्रदेश), ३० सप्टेंबर २०२०: उत्तरप्रदेशच्या हाथिरास येथली १९ वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. तसेच तिच्या हत्येचाही प्रयत्न या नराधमांनी केला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आणि दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात गेले दोन आठवड्यांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (दि. ३० सप्टेंबर) रोजी या तरुणीने प्राण सोडला. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट यांच्यावर देशभरातून नाराजी असून उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था नसल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी होत आहे. पीडितेला न्याय मिळावा यासह सरकारविरोधात ट्विटरवर आज अनेक हॅशटॅग्स ट्रेंड होत आहेत.

ट्विटरवर होतायत हे ९ हॅशटॅग्स ट्रेंड:

१) #HathrasHorrorShocksIndia
२) #YogiResignNOW
३) #JusticeForManishaValmiki
४) #ResignAdityanath
५) #बलात्कारीयोगीसरकार
६) #HathrasCase
७) #ShameOnYouHathrasPolice
८) #ShameOnUPGovt
९) #UPPolice

नक्की काय घडलं होतं?

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर ४ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आज दि. ३० सप्टेंबरला मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर या नराधमांनी तिला बोलता येऊ नये म्हणून तिची जीभ कापली, पाठीचे हाडही मोडले होते. हाथरसच्या चंदपा भागात चारा आणण्यासाठी आईसह ही तरुणी शेतात गेली होती. तेव्हा हा प्रकार घडला. या नराधमांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र, तिची तब्येत अधिक बिघडल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचे कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केले होते.

मात्र योगी सरकारच्या पोलिसांनी रातोरात या मुलीच्या घरच्यांच्या परवानगीशिवाय रात्री दोन वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार घाईगडबडीत उरकुन टाकले. यादरम्यान तिच्या घरच्यांना तिचे अंत्यदर्शनदेखील करू दिले गेले नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. या सर्व प्रकारामुळेच उत्तरप्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्थचे राज्य नसून जंगलराज असल्याची टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा