हवे तर माझे पुतळे जाळा, पण गरीबांची वाहने जाळू नका: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात देशात आंदोलन सुरू आहेत, तरी या आंदोलनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच लोकांशी बोलले. ” आंदोलना द्वारे तुम्हाला विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शाकीय मालमत्तेची हानी तसेच गरीबांची वाहने जाळू नका, अश्या प्रकारचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशाची राजधानी दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती केंद्र सरकारने नियमित केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपच्या वतीने रामलीला मैदानावर धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले.आणि रामलीला मधूनच मोदींनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात तुम्ही जी आंदोलन करत आहात त्यामध्ये हवे तर तुम्ही माझे पुतळे जाळा मला हव्या तितक्या शिव्या द्या, पण हिंसाचार, शाकीय मालमत्तेची हानी आणि महत्त्वाचे म्हणजे गरीबांचे नुकसान करू नका, ते करून तुम्हाला काय मिळणार आहे? अश्या प्रकारचा भावनिक प्रश्न मोदींनी लोकांना विचारला. देशभरात चाललेल्या आंदोलनावर बोलत असताना मोदींनी देशभरातील लोकांना शांततेच आवाहन केले आहे.
तसेच, नरेंद्र मोदींनी सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा कोणाच नागरिकत्व रद्द करण्यासाठी नव्हे तर लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आणला गेला आहे. आणि या कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याकांना नवे आयुष्य मिळेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा