काळा वाघ पाहिला का ?

ओडिशा, ५ ऑगस्ट २०२२: ओडिशा च्या सिमलीपालमध्ये स्यूडो-मेलानिस्टिक वाघ म्हणजेच काळा वाघ दिसला. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर यासंबंधी एक व्हिडीओ पोस्ट केलाय. हा दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ ओडिशा व्याघ्र प्रकल्पातील असल्याचे सांगितलं जात आहे.

व्हायरल क्लिपमध्ये, एक दुर्मिळ काळा वाघ त्याचे क्षेत्र झाडावर चिन्हांकित करताना दिसत आहे. तो आपल्या पंजाने झाडावर खुणा करतो. वाघासारख्या प्राण्यांना त्यांचा प्रदेश चिन्हांकित करणे आवश्यक आहे कारण त्यांच्यामध्ये स्वतःच्या प्रदेशासाठी युद्ध होते.

हे वाघ त्यांच्या अनुवांशिक उत्परिवर्तनामुळं फार दुर्मिळ आहेत. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात २००७ मध्ये ते पहिल्यांदा दिसले होते.’ दरम्यान, सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, “वाघ हे भारताच्या जंगलांच्या शाश्वततेचे प्रतीक आहेत…”

न्यूज अनकट प्रतिनिधी- गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा