ऑटो रिक्षावर बनवण्यात आलेले हे मिनी होम तुम्ही पाहिले का?

तामिळनाडू, १३ ऑक्टोबर २०२०: आपण अनेक परदेशी लोकांना जुन्या वाहनांपासून मिनी होम बनवलेले पाहिले असेल. असे अनेक व्हिडिओज आपण यूट्यूब वर पाहिलेही असतील. असंच काहीतरी वेगळं करण्याचा हेतूने भारतातील अरुण प्रभू याने ऑटो रिक्षावर टाकाऊ पासून टिकाऊ मिनी होम बनवले आहे. अरुण प्रभू हा तामिळनाडू स्थित एक आर्किटेक्ट आहे.

याच्या या कारनाम्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच सोशल मीडियावर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. त्याने ३६ स्क्वेअर फूट जागेच्या रिक्षामध्ये बेडरूम, लिव्हिंग रूम, किचन तसेच टॉयलेट या सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. तसेच या छोट्या जागेत वापरासाठी आणि पिण्यासाठी २५० लिटरची पाण्याची टाकी सुद्धा बसविण्यात आली आहे.

तसेच या ऑटो रिक्षामध्ये ६०० वॅटचे सोलर पॅनल आणि बॅटरी सुद्धा बसविण्यात आली आहे. अरुण प्रभूने याचे नाव सोलो ०.१ असे ठेवले आहे. तसेच सोलो ०.१ बनविण्यासाठी अरुणला १ लाख रुपये खर्च आला आहे. त्याचे म्हणणे आहे की, या प्रोजेक्टमुळे कामगारांना, छोट्या दुकानदारांना तसेच ज्यांना राहायला घर नाही त्यांना खूप मदत होऊ शकते.


न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा