हवेली,उरळी कांचन,लोणी काळभोर परिसरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

उरळीकांचन, ता.०२ मे २०२० कोरोना व्हायरसने संपूर्ण जगास वेठीस धरले असून सर्व जणांना याचा तोटा सहन करावा लागत आहे. यातीलच एक घटक म्हणजे शेती आणि शेतकरी . राज्यातील एकंदरीत शेती आणि शेतकर्‍यांची स्थिती पाहिली तर शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, वातावरणातील बदल, वेळी – अवेळी पडणारा पाऊस आणि बाजारातील होणारा चढउतार यामुळे देशातील शेतकरी मेटाकुटीला आला होता. मात्र, जून महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून काल व आज झालेल्या पावसाने थोडा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चार ते पाच दिवसापासून वातावरणातील उकाड्याने सर्व नागरिक हैराण झाले होते. पण सोमवारी पहाटे पडलेल्या पावसाने सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी रात्री एक वाजता सुरू झालेला पाऊस पहाटे पाच वाजता थांबला. मंगळवारी रात्री बारीक पाऊस चालूच होता व सकाळी परत वातावरणही ढगाळ दिसून येत आहे.

भारतीय प्रदेशावर यावर्षी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान क्षेत्रातील अनेक संस्थांनी व अभ्यासकांनी वर्तविली आहे. जून महिन्यात तब्बल १०६ मिलिमीटर पाऊसाची नोंद होईल असेही हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच पूर्व हवेलीमध्ये पावसाच्या सरी बरसल्याने हवेली तालुक्यातील शेतकरी व नागरिक थोडे सुखावले आहेत. त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहण्यास मिळाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा