गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा माढ्यात पावसाचा कहर; ढगफुटी झाल्यांने कुर्डूवाडी-करमाळा रस्ता बंद

माढ्यात पावसाचा कहर; ढगफुटी झाल्यांने कुर्डूवाडी-करमाळा रस्ता बंद

पंढरपुर, ७ ऑक्टोबर २०२२: पंढरपुर जिल्ह्यातील माढा तालूक्यात ढगफूटी झाली आहे. गुरुवारी रात्री माढा तालूक्यातील कुर्डुवाडी परिसरात झालेल्या मुसळदार पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडूंब भरुन वाहत आहेत.

यामुळे या परिसरात काही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली होती. खुप दिवसांनी या ठिकाणी असा जोरदार पाऊस पडला आहे. रात्री झालेल्या मुसळदार पावसामुळे चौभे पिंपरी येथील पाझर तलाव फुटला आहे. आणि हा तलाव फुटल्यामुळे हे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेले.

या पाण्यामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच घरांची देखील भरपुर प्रमाणात पडजड झाली असून जनावरे वाहून गेले आहेत. तर कुर्डुवाडी-करमाळा महामार्गावरील बरेच रस्ते वाहतूकी साठी बंद झाले होते. प्रशासनाने तातडीने पावले उचलत बचाव कार्य सूरु केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version