ह.भ.प राम महाराज शेळके विश्व वारकरी सेना माढाचे बनले उपाध्यक्ष

4

माढा (सोलापूर), २१ ऑगस्ट २०२०:  माढा तालुक्यातील गारअकोले गावचे नामवंत कीर्तनकार घराण्यातील ह.भ.प राम महाराज शेळके यांची विश्व वारकरी सेनेच्या माढा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड विश्व वारकरी सेना संस्थापक ह.भ.प अरुण बुरघाटे अमरावती (विदर्भ) व राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज चवरे पंढरपूरकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.

कीर्तनकार समाजाला भक्तीतून अंधश्रद्धेतून मुक्ती मिळवून देतो. समाजाला सकारात्मक विचाराचा मार्ग दाखवतो. दोनशे वर्षांपासून कीर्तनकार समाजाला योग्य मार्ग दाखवत आहेत. राम शेळके हे उत्कृष्ट फडकरी कीर्तनकार म्हणून ते नावलौकिक आहेत.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शेळके यांचा गारअकोले गावचे सरपंच माणिक पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गारअकोलेगावचे माजी सरपंच अण्णा गायकवाड, उपसरपंच दत्तू बिचकुले, मा.सरपंच जितेंद्र गायकवाड, हरिभाऊ केचे, दत्तात्रय केचे, प्रताप गायकवाड, सुरेश पवार, अंकुश बिचकुले, दत्तात्रय पवार हे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा