नवी दिल्ली, दि. १२ जून २०२०: जर आपण स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कोरोना संकटात हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. वास्तविक या काळात गृहकर्जावरील व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. देशातील बहुतेक बँकांनी व्याजदरात एकापेक्षा जास्त वेळा कपात केली आहे. त्याअंतर्गत आता हाऊसिंग लोन कंपनी एचडीएफसीने कर्जाचे व्याज दर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहे. हे नवीन व्याजदर आज १२ जूनपासून लागू झाले आहेत.
एचडीएफसीच्या या निर्णयाचा फायदा सर्व रिटेल होम लोन आणि नॉन-हाऊसिंग लोन ग्राहकांना होईल. हे व्याज दर ७.६५ ते ७.९५ टक्क्यांच्या दरम्यान असतील. एचडीएफसीच्या स्वत:च्या कर्जाची किंमत कमी झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी ने हे पाऊल स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात केलेल्या कपाती नंतर घेतले आहे.
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी कपात केली आणि ती ४ टक्क्यांच्या ऐतिहासिक निच्चांकावर आणला. यानंतर, बाजारात कर्जाचे व्याज दर सतत कमी होत आहेत. परंतू, यामुळे मुदत ठेवीदारांचे नुकसान होत असून त्यांच्या ठेवींवर त्यांना कमी नफा मिळत आहे. त्याचबरोबर असेही वृत्त आहे की व्याज दर कमी असूनही लोक कर्ज घेण्यात रस दाखवत नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी