गोल पोस्ट गुन्हा देवाला खूश करण्यासाठी स्वताला जिवंत गाडले….

देवाला खूश करण्यासाठी स्वताला जिवंत गाडले….

उत्तर प्रदेश, १२ फेब्रुवरी २०२१: आज आधुनिक २१ वे दशक चालू असले तरी देखील आपल्या देशात अंधश्रद्धा पूर्णपणे हद्दपार झाली नाही. आजही अनेक कितीतरी असे घटना अंधश्रद्धेच्या पोटी घडताना समाजात आजही घडताना दिसत आहे. ज्यामधे माणुस हा स्वताच्याच जिवावर स्वताच उठल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेश मधून समोर आली आहे.

उत्तर प्रदेशाच्या कानपूर जिल्हात भगवान शिवाला खूश करण्यासाठी एका महिलेने स्वताला जिवंत खड्ड्यात गाडून घेतले. गया श्री असे या महिलेचे नाव आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण, महिलेने देवाला खुश करण्यासाठी असा प्रकार केल्याचे स्वताहा कबूल केले आहे.

“भगवान शिव माझ्या स्वप्नात आले होते. त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी आणि भेटण्यासाठी मी स्वतःला खड्ड्यात गाडून घेणार आहे. “असे महिलेने कुटुंबियांना सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळ गाठत त्या महिलेचा जीव वाचविला.

काही दिवसांपूर्वीच हैद्राबाद मध्ये एका दाम्पत्यानें देखील मुली जिवंत होणार म्हणून दोघिंना मारून टाकले आणि विशेष म्हणजे हे कृत्य करणारे वडील हे प्राॅफेसर होता. पण, अश्या घटनेमुळे आणि अंधश्रद्धेमुळे देशाला पुन्हा एकदा अश्या विकृतीच्या आहारी जात आहे, जी फार गंभीर बाब आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version