इतर रुग्ण नाष्ट्याला गेले आसता त्याने संपवले आयुष्य….

पुणे, ७ जुलै २०२० : एकीकडे पुण्या मध्ये कोरोनाच्या आकडेवारी मध्ये घट होत नाही आणि त्यातच आता एक दुःखद घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील यवलेवाडी येथील एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने चक्क कोविड उपचार केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

हि घटना काल सकाळी १० च्या सुमारास घडली. संबंधित घटनेचा पाठ पुरावा कोंढवा पोलिसांनी केल्याचे समजते. पोलिसांनी सांगितलेल्या माहिती नुसार संबंधित इसम हा कोरोना पॉजिटीव्ह होता त्याचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संबंधित रुग्णाबरोबरचे रुग्ण सकाळी नाष्टा करण्यासाठी दुसऱ्या रूम मध्ये गेले तेव्हा हा प्रकार घडल्याचे कळते. नाष्टा करून रुग्णांनी रूम मध्ये प्रवेश केले आसता त्यांना वृद्धाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

राज्यातील अनेक ठिकाणी अशा अनेक घटना समोर येत आहेत.ज्यामधे कोरोना पाॅजिटिव्ह आहवाल आला आसता रुग्ण है नैराश्यातून स्वत:चे आयुष्य संपवत आहेत.त्या मुळे प्रशासनाने देखील अशा घटनांचे चिंतन करणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा