कर्जत, दि. १३ मे २०२०: कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत काम करणारा एका सर्व सामान्य कुटुबांतील कार्यरत असलेला कार्यकर्ता, बहुजन जनतेच्या मुलभूत गरजेच्या प्रश्नावर जनआंदोलन उभे करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणारा, आपल्या अगदी कमी वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने अनेकांना भुवया उंचवायला लावणारा, सामान्य कुटुंबातील कोणताही राजकीय वारसा नसलेला कार्यकर्ता असलेल्या कर्जत येथील भास्कर भैलुमे यांना आंबेडकरी चळवळ तालुक्यात व जिल्हयात वाढविण्यासाठी राशिन येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील नेते महेद्र हिरवे व अंजलीताई हिरवे यांनी आपली स्वत:ची चार चाकी गाडी सप्रेम भेट दिली.
त्या बद्दल भास्कर भैलुमे यांनी हिरवे यांचे आभार व्यक्त करत झेंडा जरी कोणत्याही पक्षाचा असला तरी दांडा माञ आंबेडकरी विचाराचाच आहे. त्यामुळे आपण जो माझ्यावर विश्वास टाकुन मला आंबेडकरी चळवळ गतीमान करण्यासाठी आपण दिलेल्या गाडीतून कामाची गती नक्कीच वाढवेन असे भास्कर भैलुमे यांनी सांगितले.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते महेद्र हिरवे माजी सरपंच रामकिसन साळवे भाऊसाहेब तोरडमल अनुराग भैलुमे, विजय साळवे, निलेश भैलुमे, संतोष आखाडे, किशोर कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष